Sunday, November 03, 2019

ती संध्याकाळ

त्या संध्याकाळी अचानक तू माझ्या समोर आलीस, ..... मला असे वाटले कि त्यावेळी आकाशातील सारे तारे जणू आपल्या भेटीची वाटच बघत लटकले होते ............ ♥ कारण,"ज्या क्षणी तुला मी पाहिले त्याच क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो आणि तेवढयात तिकडे तो तारा सुद्धा गळून पडला ....... आणि "आपण दोघे एकमेकांसाठीच बनलो आहोत" ह्याचा  मला  पुरावा मिळाला

Sunday, September 29, 2019

पावसाचं गाणं...

पावसाचं गाणं... आणी गाण्यातला पाऊस
तुझी आणि माझी.... भिजण्याची हौस.

तुला आवडते भिजणे चिंब, मला मात्र थेंब अन थेंब
न्हाऊन निघतो दोघेही आपण....
फरक फ़क्त भिजण्याचा,
तू म्हणतेस "जाऊदे आता" अन मी म्हणतो' "नको ना जाऊस"
पावसाचं गाणं... आणी गाण्यातला पाऊस 
तुझी आणि माझी.... भिजण्याची हौस.

सरीवर सरी आणि गंधाळलेली गात्र
वीजांचा कड़कड़ाट आणि काळीकुट्ट रात्र
शब्दांतील श्वास आणी श्वासांमधले अंतर
कलहाच्या ओलाव्यात भिजून जाते मात्र.... फरक फ़क्त भिजण्याचा
तू म्हणतेस "जाऊदे आता" अन मी म्हणतो' "नको ना जाऊस"
पावसाचं गाणं... आणी गाण्यातला पाऊस 
तुझी आणि माझी... भिजण्याची हौस.