आणि अचानक त्या वेळी
ती राणी तो राजा झाला
भातुकलीच्या खेळामधला
अदभुत उत्कट डाव रंगला
वाटेवरती केव्हा फुलले
हिरवे पिवळे गवत कोवळे
रात्रीवर रात्री अशाच गेल्या
उरले मधले दिवस वेगळे
राजा राणी नुरले आता
दोन जीव अन दोन तराणे
मनामनांच्या मखमालीवर
वेड्यांचे हे स्वप्नं शहाणे
फुलता फुलता फुल बहरले
वाऱ्यावरती गंध पसरले
प्रेम कहाणी राजा राणी
अतिउत्कट गगनाला भिडले
आणि अचानक त्या वेळी
गाभाऱ्यातून वारा भरला
सुगंधदायी पाकळीस त्या
निर्दय निष्ठुर खुडू लागला
राजा राणी गाऊ लागले
विरहव्यथेची गाणी
भातुकलीचा खेळ संपला
उरले अश्रू प्रेमकहाणी
प्रेम केवळ जगाची आशा
असे म्हणुनी काम करावे
सुंदर प्रेमळ जरी शहाणे
वेड्यांनी कि स्वप्नं पाहावे
No comments:
Post a Comment