Wednesday, May 18, 2011

ज्योत दिव्याची

ज्योत दिव्याची ती आज एकांती पाहता 
तो भाव काळजाचा मन जागवून गेला
अस्तित्व हेच माझे आता विरून गेले 
हा अंत वेदनेचा सांगून सर्व गेला   

एकांत राहिलेला हरवून सर्व वाटा 
डोळ्यांत आसवांच्या बुडवून सर्व गेला 
आसावल्या क्षणांची ती मिणमिणती ज्योत दिव्याची 
आपल्याच रिकाम्या ओंजळी विझवुनी सर्व गेला  

एकांत राहिलेला हरवून सर्व वाटा  
विरहात मिलनाचा सांगून अर्थ गेला  
विझवुनी ती ज्योत दिव्याची  
आसावल्या क्षणांचा पक्षी उडून गेला 









No comments:

Post a Comment